Energy Minister's announcement for the heirs of MSEB employees 
महाराष्ट्र बातम्या

महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळवृत्तसेवा

नागपूर : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारांमार्फत कार्यरत बाह्यस्त्रोत (कंत्राटी) कामगार आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास त्यांच्या वारसांनाही 30 लाखांचे अनुदान सहाय्य पुरविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या काळात सदैव कार्यरत असणाऱ्या याच कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना सर्व सुविधा वेळेत मिळाल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल. यासाठी मृत्यूचे कारण हे कोविड-19 विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय, पालिका, महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे सादर करणे बंधनकारक आहे. सानुग्रह अनुदानाच्या लाभासाठी कामावरील उपस्थितीबाबत असणाऱ्या अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT