Home Minister Anil Deshmukh has taken notice of the work of Wasmatphata Highway Police.jpg 
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख प्रकरणात पुण्यातील मोठा अधिकारी ईडीच्या रडारवर

ओमकार वाबळे

शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. सचिन वाझेचीही उर्वरित चौकशी पार पडली. त्याचसोबत देशमुख देखील उपस्थित होते. मात्र देशमुखांशी निगडीत मनी लाँडरिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या पाठिशी चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी (IPS Transfer racket) सक्तवसुली संचालनालयानं (ED) आत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुण्याच्या पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे.

या पूर्वी ईडीने राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड(Kailas Gaikwad) यांना समन्स बजावत चौकशीला बोलावलं होतं. काही दिवसांपूर्वी सिताराम कुंटेही(Sitaram Kunte) चौकशीला जाऊन आले. नुकतेच या प्रकरणात आणखी एका डीसीपीचा जबाब ईडीने नोंदवला आहे. ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणात ईडीने पुणे वाहतूक पोलिसांचे डीसीपी राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांची चौकशी केली.

ईडीने त्याला गुरुवारी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. त्यानंतर श्रीरामे दुपारी एकच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांची सुमारे 7 तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.

आज ईडीने अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांना आज 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.

अकोल्याचे पोलीस अधीक्षक ईडी कार्यालयात?

अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (G.Shridhar) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) समन्स जारी केला आहे. यानुसार त्यांना येत्या 17 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. यासाठी ते उपस्थित देखील राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांच्यासंबंधी मनी लाँडरिंगचं प्रकरण (Money Laundering) सुरू आहे. खंडणी प्रकरणातही त्यांची चांदिवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत जी. श्रीधर यांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर या प्रकणारत श्रीधर यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील ऐतिहासिक विधि महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT