Shivsena UBT Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena UBT: तिकिट जाहीर पण आले ईडीचे समन्स, ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; काय आहे प्रकरण?

Shivsena UBT: ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे. अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स पाठवले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Shivsena UBT: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे. अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स पाठवले आहेत. आज अमोल कीर्तिकर यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. खिचडी गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मधून लोकसभेचे उमेदवार आहेत.

दरम्यान आज अमोल कीर्तिकर यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. या ईडीच्या समन्समुळे अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तिकरांना ईडीने समन्स बजावले आहे . विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे समन्स देण्यात आले असून आज (27 मार्च) सकाळी 11:00 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांच्यासोबत अमोल कीर्तिकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले आहे.

याआधी सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमोल किर्तीकरांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे आज किर्तीकरांची किती तास चौकशी होणार हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. तर ठाकरे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये किर्तीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT