रेल्वे अपघात  सोलापूर
महाराष्ट्र बातम्या

Solapur Train Accident : सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या Kk एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग; 2 तासानंतर आग...

मोहोळ- कूर्डूवाडी रेल्वे रूळावरील घाटणे परिसरात रेल्वे इंजिनने पेट घेतला. यात कोणताही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहीती आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या केके रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. चालकाला मागून येणारा धूर दिसू लागला. चालकाने प्रसंगावधान साधून गाडी जागेवर थांबवली आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हाताला व अंगाला भाजले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकरी देखील त्या ठिकाणी धावले, त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. अग्नीशमन यंत्रणेद्वारे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न झाले. यावेळी सर्व प्रवाशांच्या चेहर्‍यावर चिंता आणि भीती होती.

मोहोळ- कूर्डूवाडी रेल्वे रूळावरील घाटणे परिसरात हा रेल्वे इंजिनने पेट घेतल्याचा प्रकार घडला. दरम्यान या घटनेत कोणताही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहीती आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गाडी पुढील प्रवासासाठी रवाना

दरम्यान ही आग आटोक्यात आल्यावर दुसरे इंजिन बोलावून घेण्यात आले . आता 2 तासानंतर गाडी नवीन इंजिनसह दिल्लीकडे मार्गस्थ झाली आहे. चालक देखील बदलण्यात आला आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT