Solapur railway Sakal
महाराष्ट्र बातम्या

Breaking! चालक स्वतः भाजला, पण त्याने रेल्वे थांबवलीच; KK एक्सप्रेसच्या इंजिनला आग; 2 तासानंतर गाडी रवाना

सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या के. के. एएक्सप्रेसच्या रेल्वे इंजिनने पेट घेतला होता. रेल्वे ड्रायव्हर होरपळुन झाला. जखमी रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

चंद्रकांत देवकते

सोलापूर : सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या के. के. एएक्सप्रेसच्या रेल्वे इंजिनने पेट घेतला होता. रेल्वे ड्रायव्हर होरपळुन झाला. जखमी रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

(स्थानिक शेतकऱ्यांनी केली मदत) कधी न थांबणारी रेल्वे अचानक थांबली असुन रेल्वेच्या इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपासच्या शेतकरी विश्वनाथ देशमुख, किशोर देशमुख, रामचंद्र चव्हाण, गणेश लाळे, अमृत देशमुख, प्रदीप गायकवाड, दादासाहेब वाघमोडे, सोमा बनसोडे, आनंद गुंड, राहुल गायकवाड, दिनेश गायकवाड आदींनी रेल्वेकडे धाव घेत आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अतिशय कठीण प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाबद्धल घाटण्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गावकरी व आसपासच्या नागरिकांचे आभार मानले.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगलोरहुन कन्याकुमारीकडे निघालेल्या के. के. एक्सप्रेसने मोहोळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर घाटणे गावाजवळ रेल्वेचे इंजिन पेटल्याचे रेल्वे चालक विकासकुमार याच्या लक्षात आले. तात्काळ रेल्वेचालक विकास कुमार यांने अतिशय धाडसाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करीत पहिल्यांदा गाडी बंद केली. पहिल्यांदा रेल्वे थांबविली व गाडी थांबल्यानंतर रेल्वे इंजिनमधून खाली उडी मारली. या प्रयत्नामध्ये रेल्वेचालक आगीने होरपळला असुन गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे चालकास रेल्वेतील पोलिस कर्मचार्‍यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी मोहोळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूरला रवाना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT