Environment Day Root Library Roots at Home Forest Nursery parnshad mumbai Sakal
महाराष्ट्र बातम्या

पर्यावरण दिन विशेष : घरातच रुजली ‘रोप लायब्ररी’ची मुळे

पर्यावरणाचे जतन : शुद्ध हवेसाठी नागरिकांकडून प्रतिसाद; मुंबईतील संस्थांची अनोखी संकल्पना

- सुनीता महामुणकर

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दोन ते अडीच वर्षांत प्रत्येकालाच दोन गोष्टींचे महत्त्व आणि गरज हमखास जाणवली. या दोन गोष्टी म्हणजे ऑक्सिजन आणि शुद्ध हवा. पण शहरातील सिमेंटच्या जंगलात त्या मिळणे कठीण. त्यासाठी घर आणि परिसरात झाडे लावण्याचा एक साधा-सोपा पर्याय आहे; पण तेही अनेकदा शक्य होत नाही. एक तर जागेची अडचण आणि दुसरे म्हणजे झाडांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ. हीच गरज ओळखून मुंबई आणि ठाण्यात रोपांची लायब्ररी सुरू करण्याची आगळी कल्पना ‘फॉरेस्ट नर्सरी’ आणि ‘पर्णशाद’ अशा दोन पर्यावरणस्नेही संस्थांनी राबवली. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

ठाण्यातील बाळकूम परिसरात सोनाली कुंभार यांची ‘फॉरेस्ट नर्सरी’ आहे. रोपांच्या लायब्ररीची मूळ संकल्पनाही त्यांचीच. विशिष्ट कालावधीसाठी कार्यालय आणि घरात रोपे पुरवून त्यांची लायब्ररी सुरू करता येऊ शकते, अशा भूमिकेतून नवीन संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला कॉर्पोरेट आणि काही सरकारी कार्यालयांमध्ये अशी लायब्ररी सुरू करण्यात आली. पण कोरोना कालावधीत सर्वच कार्यालये बंद झाली आणि त्याचा फटका प्रत्येकालाच बसला. दरम्यान घरांमध्ये रोपांची लायब्ररी सुरू करण्याची मागणी होऊ लागली आणि आता कार्यालयाबरोबरच घरीही अनेक जण त्यात सहभागी होत आहेत, असे सोनाली कुंभार यांनी सांगितले.

‘‘ऑक्सिजन पुरवणारी आणि हवा शुद्ध ठेवणारी रोपे किंवा झाडांना मागणी आहे. कोरोनापासून त्याबाबत अधिक जनजागृती झाली आहे. त्याशिवाय शोभेच्या झाडांनाही मागणी असते. काही जणांना तुळस आणि अन्य भाज्यांची रोपेही हवी असतात. साधारण ३५ हून अधिक प्रकारची झाडे आम्ही देत असतो. वास्तुशास्त्र पाहून रोपे घेणारी आणि तशी मागणी करणारेही अनेक असतात, असे कुंभार यांनी सांगितले. सध्या त्यांच्या लायब्ररीत विविध प्रकारची रोपे आणि बिया उपलब्ध आहेत. ‘फॉरेस्टलाईव्हनर्सरी’ (www.forestlive.in) नावाने त्यांचे संकेतस्थळही उपलब्ध आहे.

इनडोअर रोपांसाठी मागणी

मुंबईमध्ये ‘पर्णशाद’ संस्था रोप लायब्ररीमध्ये काम करते. प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ ही नर्सरी आहे. मंदिरातही आम्ही रोप लायब्ररीचे काम केले आहे, असे ‘पर्णशाद’च्या तेजल सुर्वे यांनी सांगितले. कोरोनानंतर जनजागृती होऊन इनडोअर रोपांसाठी मागणी होत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

‘फॉरेस्टलाईव्हनर्सरी’मधील रोपे

पार्लर पाल्म, अम्ब्रेला, फिडल लिफ, रबर प्लांट, स्नेक प्लांट, अरेका पाम, मॉइस्तिक पॉथोस, मनी प्लांट, चायनीज एव्हरग्रीन, क्रोटोन, फिलोडेड्रोन, पेन्सिल कॅक्टस, झेड झेड, गुसफूट, डंप कॅन, अरेलिया, पीस लिली, स्पाईडर प्लांट, पेप्रोमिया आदी.

अशी आहे संकल्पना

सर्वसाधारण रोपांची लायब्ररी किमान वर्षभरासाठी सुरू करता येऊ शकते. दर महिन्याला दहा रोपे मिळू शकतात. प्रत्येक महिन्याला ती बदलता येतात. रोपांची देखभाल आणि त्यांना पाणी, खत व जंतुनाशक देण्याची जबाबदारी संस्थेची असते. एखाद्या व्यक्तीला स्वतः देखभाल करायची असेल, तर त्याला पूर्ण मुभा आहे. रोपांची लायब्ररी सुरू केल्यानंतर ती जगतील का, खराब नाही ना होणार, त्यांना कीड तर लागणार नाही ना इत्यादी सर्व प्रश्नांतून आपली सुटका होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT