latur latur
महाराष्ट्र बातम्या

लातूरात तृतीयपंथीयांसाठी कल्याण समितीची स्थापना

तृतीयपंथीयांकडे आधार, मतदान, रेशनकार्ड, बँक खाते नसल्यास ते काढून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते

सकाळ वृत्तसेवा

लातूर: सामाजिक न्याय विभागाकडून तृतीयपंथीयांच्या कल्याणाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजाणीसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती दरमहा आढावा घेऊन तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध निर्णय घेईल.

तृतीयपंथीयांकडे आधार, मतदान, रेशनकार्ड, बँक खाते नसल्यास ते काढून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार २२ जुलैला जिल्ह्यातील १२ तृतीयपंथीयांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. काही आधारकार्डमध्ये दुरुस्त्या होत्या. येथे पंचायत समिती कार्यालयातील सुविधा केंद्रात शिबिर घेऊन हे काम करण्यात आले. बारा तृतीपंथीयांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये बचत खाते काढण्यात आले.

तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. बारा लोकांना याआधीच शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या असून आधारकार्डाशी लिंक करण्याची कार्यवाही झाली. सात लोकांकडून मतदान कार्ड काढण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले. आधार-मतदान-रेशनकार्ड, बँक खाते मिळालेले नाही किंवा काढले नाही अशांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT