europeon girls mathematics olympiad team sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रीय मुलींचा आंतरराष्ट्रीय पराक्रम;......या संघात मिळवले स्थान

हंगेरी येथे आयोजित मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाड संघात महाराष्ट्रातील दोन मुलींनी स्थान पटकावले आहे.

नमिता धुरी

६ ते ११ एप्रिल दरम्यान हंगेरीतील एगर येथे होणाऱ्या अकराव्या ‘मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाड’ (इजीएमओ २०२२) स्पर्धेसाठी भारतीय मुलींचा संघ मंगळवारी मुंबई येथून रवाना झाला. यात महाराष्ट्रातील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

नाशिकची सानिका बोराडे आणि पुण्याची अनन्या रानडे या १७ वर्षीय मुलींनी भारतीय संघात स्थान पटकावले आहे. तसेच दिल्लीच्या अगरवाल भगिनी अनुष्का व गुंजन यांचाही या संघात समावेश आहे. त्यांच्यासोबत ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या राष्ट्रीय समन्वयकांचा चमूही स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. यात पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाच्या अदिती फडके, बंगळुरूच्या ‘भारतीय विज्ञान संस्थे’चे पुलकित सिन्हा आणि मुंबईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (आयआयटी मुंबई) रोहिणी जोशी यांचा समावेश आहे.

संघात निवड झालेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या आयओक्यूएम-२०२१, आयएनएमओ-२०२१ व टीएसटी-इजीएमओ या तीन टप्प्यांतील परीक्षांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा निकाल ११ एप्रिलला संध्याकाळपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP विरोधात, अमित शाहांविरोधात घोषणा दिल्या... पोलिसांची तडीपारीची कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? पोलिसांना फटकारले

'होय, मी लग्न करतोय' मुलासमोर तिसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानं आमिर खान ट्रोल, नेटकरी म्हणाले...'यांच्याकडे सूनाऐवजी सासू...'

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

SCROLL FOR NEXT