bmc esakal
महाराष्ट्र बातम्या

गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

बायोमेट्रिक मशीनमुळे पगार कपातीने कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीत मशीनच्या बिघाडाचा फटका हा कर्मचाऱ्यांना पगाराच्या रूपात बसत आहे. मशीन सातत्याने बंद पडत असल्याने एेन गणेशोत्सवाच्या तोंडावर कामगारांच्या पगाराची मोठी रक्कम कापून घेण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. आगामी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेऊनच कामगारांना पूर्ण पगार द्यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.

अनेक कामगारांचे सदोष मशीनमुळे 20 हजार ते 25 हजार रूपये कापण्यात आले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना शून्य पगार आला आहे. तर कामगारांच्या हातात पगार कापून आल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. काम करूनही सदोष बायोमेट्रिक मशीनमुळे कामगारांचे खाडे होत असतील, कामगारांचे हजारो रूपये कापले जात असतील तर अशा हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये अशीही मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

पूर्वीप्रमाणेच मस्टरवर हजेरी लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बायोमेट्रिकची हजेरी ही पगाराशी जोडली जाऊ नये. प्रशासनाने यामध्ये चर्चा करून मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियननने दिला आहे. गणपती सण घेऊन लक्षात घेऊन कामगारांना पगार द्यावा अशी मागणी युनियनचे सरचिटणीस वामन काविस्कर यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा यांना केली आहे. ही विनंती मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या महानगरपालिकेच्या कार्यालयात घेतल्या गेलेल्या बायोमेट्रिक मशीन या तुटपुंज्या असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. 20 कामागारांच्या मागे 1 मशीन असे आदेश प्रशासनाने काढले होते, परंतु 70 ते 80 कामागारांसाठी सध्या एक मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ होते. अनेकदा मशीनला इंटरनेट नसल्याने सर्व्हर कनेक्टिव्हिटीही नसते, असेही युनियनने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT