chandrakant patil  Sakal
महाराष्ट्र बातम्या

६५ वर्षांनंतरही सोलापूरकरांच्या नशिबी प्रतीक्षाच! २५० कोटींत अडकले शासकीय अभियांत्रिकी कॉलेज; मंत्रिमंडळ व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनच्या जागेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आहे. गतवर्षी पुण्यातील तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी अभ्यासाअंती अहवाल संचालकांकडे पाठविला. संचालकांकडून तो अहवाल आता मंत्रिमंडळाकडे गेला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनच्या जागेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आहे. गतवर्षी पुण्यातील तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी अभ्यासाअंती अहवाल संचालकांकडे पाठविला. संचालकांकडून तो अहवाल आता मंत्रिमंडळाकडे गेला आहे. पाच अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता ३०० व ६० प्राध्यापक आणि २५० कोटींची गरज, अशा बाबी त्यात समाविष्ट आहेत. पण, त्या अहवालास ना मंत्रिमंडळाची ना वित्त विभागाची मंजुरी मिळाली.

कराड येथे १९६० मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. त्याचवेळी सोलापूरकरांचीही मागणी होती. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या संघटनांनी पुढे ही मागणी लावून धरली. खासदार प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सोलापूरकरांची मागणी त्यांना कळविली होती. त्यानंतर तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही संघटनांनी निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली. सोलापूर शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यासंबंधीचा पाठपुरावा केला. त्यानंतर सहा अधिकाऱ्यांनी सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अभ्यास करून त्यासाठी लागणारी जागा, मनुष्यबळ, साधनसामुग्री, इमारती व त्यासाठी लागणारा निधी, यासंदर्भातील अहवाल संचालकांना पाठविला. त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सोलापूरकरांना खूप आशा आहेत.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी सुरू होईल, अशी आशा होती, मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात देखील ते सुरू होणार नाही, अशी स्थिती आहे. कारण, त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन वित्त विभागाकडून निधी प्राप्त करून घ्यावा लागेल. त्यानंतर इमारती बांधून प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल, असे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

शासनाला पाठविला अहवाल

सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण

रत्नागिरी, कोल्हापूर, लातूरला झाले, पण...

१९६० मध्ये कराड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय झाले, त्याचवेळी सोलापूरकरांची देखील मागणी होती. मात्र, आजपर्यंत सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले नाही. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात खासगी १५ अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली, पण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुहूर्त लागला नाही. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून देखील सोलापूरला नाही पण रत्नागिरी, कोल्हापूर व लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये सुरु झाली, हे विशेष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सोलापूरकरांना खूप आशा आहेत.

असा आहे प्रस्ताव...

  • एकूण अभ्यासक्रम

  • प्रवेश क्षमता

  • ३००

  • प्राध्यापकांची गरज

  • ६०

  • अपेक्षित निधी

  • २५० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT