solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

दारूबंदीच्या ठरावानंतरही गावात हातभट्टीची विक्री! हातभट्टीने मोडला नवविवाहितेचा सोन्याचा संसार; 2 मुले बालपणातच वडिलांविना पोरकी, ‘त्या’ प्रसंगाने अख्खे गाव हळहळले

वयाच्या २६ व्या वर्षी विवाह झालेल्या तरुणाला पहिली मुलगी झाली, दीड-दोन वर्षांनी मुलगा झाला. बॅंक मित्र म्हणून जॉबही होता. विवाहानंतर साडेपाच-सहा वर्षे त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण, त्यांच्या संसाराला दारूची नजर लागली आणि गावात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीने त्याचा जीव घेईपर्यंत साथ सोडलीच नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : वयाच्या २६ व्या वर्षी विवाह झालेल्या तरुणाला पहिली मुलगी झाली, दीड-दोन वर्षांनी मुलगा झाला. बॅंक मित्र म्हणून जॉबही होता. विवाहानंतर साडेपाच-सहा वर्षे त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण, त्यांच्या संसाराला दारूची नजर लागली आणि गावात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीने त्याचा जीव घेईपर्यंत साथ सोडलीच नाही. आता ती विवाहिता, तिची दहा वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन आयुष्याचा गाडा ओढत जीवन जगत आहेत. ही व्यथा आहे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावातील एका विवाहितेची.

अभ्यासात हुशार पण कौटुंबिक परिस्थितीमुळे कला शाखेतून एमएपर्यंत शिक्षण पूर्ण केलेला तरुण गावातील मावस भावाच्या इलेक्ट्रॉनिक दुकानात घड्याळ दुरुस्तीसह अन्य कामे शिकला होता. काही महिन्यांनी त्याला गावाजवळील एका ग्रामीण बॅंकेत बॅंक मित्र म्हणून संधी मिळाली आणि त्याला वाटले विवाह झाला, मुलगी झाली आणि जॉबही लागल्याने त्याचे आयुष्य सुखर झाले होते. मात्र, सुरवातीला अधूनमधून विदेशी दारू पिणारा तो तरुण कधी व्यसनाच्या आहारी गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. एकेकाळी तो दारू पिणाऱ्याच त्रागा करीत होता. वडील, भाऊ दारू प्यायचे तर त्यांना तो रागवायचा, पण तोच दारूच्या आहारी गेला होता. सुरवातीला त्याने जॉब सोडला आणि हाती पैसे नसल्याने तो कामाविना गावात फिरू लागला.

गावात पाच-सहा ठिकाणी सहजपणे हातभट्टी दारू मिळत होती. त्यामुळे तो सकाळी उठून गावात आल्यावर, दुपारी, रात्री कायम हातभट्टी प्राशन करू लागला. दारू सोडायचा विचार मनात यायचा, पण गावात सहज हातभट्टी मिळत असल्याने त्याला ते व्यसन सोडता आले नाही. त्या तरुणाच्या मृत्यूनंतर ती विवाहिता मुलीला शाळेत पाठवून चिमुकल्या मुलाला सोबत घेऊन मिळेल ते काम करून आयुष्याचा संघर्ष करीत आहेत.

ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव, तरीही...

सावळेश्वर ग्रामपंचायतीने दहा-बारा वर्षांपूर्वीच ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव केला आहे. तरीदेखील, गावात हातभट्टी विक्री होत असल्यावरून गावकऱ्यांनी मोहोळ पोलिसांना लेखी निवेदनेही दिली. पोलिसांनी काहीवेळा कारवाई केली, पण त्यांना गावातील हातभट्टीची विक्री त्यांना थांबविता आलेली नाही. अजूनही अनेक तरुण हातभट्टीच्या आहारी गेलेले दिसतात.

‘त्या’ प्रसंगाने अख्खे गाव हळहळले

पत्नी ही मुलीसह माहेरी गेलेली होती, त्या दिवशी तो तरुण आणि त्याचा साडेचार वर्षाचा चिमुकला हेच घरी होते. वडिलांना सोडून न राहणारा तो चिमुकला रात्री वडिलांजवळ झोपला होता. सकाळी सात-साडेसात वाजले तरी मुलगा उठला कसा नाही, म्हणून त्या तरुणाच्या आईने दरवाजा उघडला तर चिमुकला वडिलांच्या अंगावर झोपलेला होता, पण तो तरुण उठत नव्हता. त्याचा रात्रीच मृत्यू झाला होता. हा प्रसंग पाहून अख्खे गाव हळहळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT