doctor prachar.jpg
doctor prachar.jpg 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : डॉक्‍टरही सरसावले डॉक्‍टरांच्या प्रचारात 

सकाळ वृत्तसेवा

देवळा : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. देवळा तालुक्‍यात तर डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी देवळ्यातील डॉक्‍टरांची टीमच उतरल्याने "डॉक्‍टरही सरसावले डॉक्‍टरांच्या प्रचारात' असे चित्र दिसत आहे. 

डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी युवा, महिला, कार्यकर्ते असे सगळेच सक्रिय

या निवडणुकीच्या फडात सध्या युवा, महिला, कार्यकर्ते असे सगळेच सक्रिय झाले आहेत. त्यात शुक्रवारी (ता. 11) येथील डॉक्‍टरही आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. डॉक्‍टर व पेशंट यांचे नाते तसे जिव्हाळ्याचे असते. बहुतेक मतदार व त्यांचे कुटुंबीय यांचा पेशंट या नात्याने डॉक्‍टरांशी संपर्क येतच असतो. हाच धागा पकडून येथील डॉक्‍टरांनी आपले सहकारी व महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना साथ देण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष प्रचारातही ते सक्रिय झाले आहेत. 

 "डॉक्‍टर आपल्या दारात' यामुळे मतदारही चकित

शनिवारी त्यांनी वाजगाव, खर्डे, खर्डे बाजार, मुलूकवाडी, कणकापूर, शेरी, वार्शी, वडाळा, हनुमंतपाडा, घोड्याची अडी या गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. डॉ. राहुल आहेर यांनी केलेली विकासकामे तसेच आगामी पाच वर्षांतील भूमिका पटवून देत व प्रचारपत्रके वाटत डॉ. राहुल आहेर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. "डॉक्‍टर आपल्या दारात' यामुळे मतदारही चकित झाले. काही ठिकाणी कोपरासभा, चौकसभा घेण्यात आल्या. यात डॉ. रमणलाल सुराणा, डॉ. ज्ञानेश्‍वर थोरात, डॉ. प्रशांत निकम, डॉ. अनिल चव्हाण, डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. गणेश निकम, डॉ. किशोर भामरे, डॉ. सतीश वाघ, डॉ. योगेश बच्छाव यांच्यासह शहर व तालुक्‍यातील डॉक्‍टर सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT