canva
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पदवी-पदव्युत्तर पदवीच्या नापास विद्यार्थ्यांनाही आता मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश; विद्यापीठाने ‘कॅरिऑन’साठी नेमली ‘या’ ५ सदस्यांची समिती, वाचा...

पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना पहिल्या वर्षात काही विषय मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’तून पुढच्या (द्वितीय वर्षात) वर्गात प्रवेश मिळतो. तो विद्यार्थी पहिल्या वर्षात उत्तीर्ण झाला तरच त्याला तिसऱ्या वर्षाला प्रवेश द्यावा, असा नियम आहे. मात्र, आता एखाद्या वर्षातील काही विषय राहिले किंवा त्या वर्षात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरी त्याला ‘कॅरिऑन’मधून पुढील वर्षाला प्रवेश मिळणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना पहिल्या वर्षात काही विषय मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’तून पुढच्या (द्वितीय वर्षात) वर्गात प्रवेश मिळतो. तो विद्यार्थी पहिल्या वर्षात उत्तीर्ण झाला तरच त्याला तिसऱ्या वर्षाला प्रवेश द्यावा, असा नियम आहे. मात्र, आता एखाद्या वर्षातील काही विषय राहिले किंवा त्या वर्षात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरी त्याला ‘कॅरिऑन’मधून पुढील वर्षाला प्रवेश मिळणार आहे. पण, त्यासाठी पाच सदस्यीय समित्या अहवालाची वाट पाहावी लागणार आहे.

पहिल्या वर्षात उत्तीर्ण झालेला विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी आपोआप पात्र ठरतो. तसेच दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाही ‘एटीकेटी’च्या निकषांनुसार द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. तृतीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी तो विद्यार्थी प्रथम वर्षात उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र, काही विषयांत अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसह मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गातील प्रवेश नाकारू नयेत (कॅरिऑन), अशी मागणी सोमवारी (ता. २८) विद्या परिषदेच्या बैठकीत झाली.

या निर्णयाचा लाभ २०२० पासून पदवी व पदव्युत्तर पदवी पूर्ण करू न शकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना होणार असल्याचा दावा या बैठकीत काही सदस्यांनी केला. पण, ‘कॅरिऑन’चा निर्णय विद्यापीठासाठी डोकेदुखी ठरल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना यापूर्वीच आल्याने कुलगुरूंनी पाच सदस्यीय समिती नेमून अहवाल मागविला आहे. आता ‘कॅरिऑन’मधून कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ होणार की विद्यापीठासमोरील डोकेदुखी वाढणार, हे समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘या’ पाच सदस्यांची समिती

कॅरिऑनचा निर्णय कोणत्या वर्षीपासून लागू करायचा?, त्याची नियमावली काय असावी?, यासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी डॉ. शशिकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीचे सदस्य सचिव विद्यापीठाचे कायदा अधिकारी खैरादी असून डॉ. हनुमंत आवताडे, डॉ. पी. एम. पवार, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली गायकवाड हे समितीचे सदस्य आहेत. समितीला अहवाल सादर करण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. समितीच्या अहवालावरून विद्यापीठाचे कुलगुरू निर्णय घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT