School  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात १.१० कोटी महिला अन्‌ ५६ लाख पुरूष निरक्षर! शिक्षकांच्या माध्यमातून होणार घरोघरी सर्व्हे; ‘उल्लास’मधून निरक्षरांची परीक्षा

महाराष्ट्रातील ११ कोटी लोकसंख्येतील पाच कोटी ४० लाख महिला आणि त्यापैकी एक कोटी १० लाखांवर महिला निरक्षर असल्याचे २०११ च्या जनगणनेतून समोर आले. त्या सर्वांना साक्षर करण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. आता ‘उल्लास’ उपक्रमांअतर्गत २१ सप्टेंबर रोजी निरक्षरांची परीक्षा नियोजित आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्रातील ११ कोटी लोकसंख्येतील पाच कोटी ४० लाख महिला आणि त्यापैकी एक कोटी १० लाखांवर महिला (२४.१३ टक्के) निरक्षर असल्याचे २०११ च्या जनगणनेतून समोर आले. त्या सर्वांना साक्षर करण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. आता ‘उल्लास’ उपक्रमांअतर्गत २१ सप्टेंबर रोजी राज्यभरात निरक्षरांची परीक्षा नियोजित आहे. त्यात ३० ते ८० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी असणार आहेत. त्यानंतर निरक्षरांच्या शोधासाठी शिक्षकांमार्फत पुन्हा सर्व्हे होणार आहे.

देशात २०११ च्या जनगणनेनुसार २४ कोटी ८२ लाख निरक्षर होते. त्यानंतर ‘साक्षर भारत’ आणि ‘पढना लिखना’ अशा योजनांमुळे निरक्षरांचे प्रमाण घटले, पण अजूनही देशात अंदाजे १८ कोटी असाक्षर आहेत. महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार १५ वर्षे व त्यावरील पुरुष असाक्षर सुमारे ५३ लाख तर निरक्षर महिलांची संख्या एक कोटी १० लाख इतकी होती. ‘साक्षर भारत’ योजना राज्यातील दहा जिल्ह्यांत राबवली गेली, जिथे स्त्री निरक्षरता ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती. मार्च २०२४ मध्ये झालेल्या ‘उल्लास’ परीक्षेतून एक लाख ३० हजार पुरुष तर दोन लाख ९५ हजार महिला साक्षरतेच्या प्रवासात पुढे सरसावले. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत ही संख्या सहा लाख ६७ हजारांपर्यंत पोचली आहे. राज्यातील असाक्षरता संपविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘उल्लास’ अभियान हाती घेतले आहे.

जनगणना न झाल्याने समजेनात निरक्षर

२०११ नंतर देशात जनगणना झाली नाही. त्यामुळे १५ वर्षांत राज्यात किती निरक्षर आहेत याची आकडेवारी समोर आलेली नाही. सध्या आर्थिक परिस्थितीमुळे, शिकूनही नोकरी नसल्याने वाढलेल्या बेरोजगारीमुळे मधूनच शाळा सोडणारे, शाळेत न जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जनगणनेनंतर ही आकडेवारी समोर येईल, तत्पूर्वी सर्व निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली आहे.

शिक्षणामुळे आरोग्यदायी कुटुंब घडते

युनेस्कोने १९६६ साली ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून घोषित केला. जगभरातील निरक्षरता दूर करणे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे हा त्यामागील हेतू आहे. स्त्री साक्षर झाली की ती केवळ स्वतःचे जीवन उजळवत नाही, तर आरोग्यदायी कुटुंब उभे करते. मुलांना योग्य संस्कार देऊन आर्थिक स्वावलंबनाची वाट मोकळी करते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि समाजाला नवी दिशा देते.

- राजेश क्षीरसागर, शिक्षण सहसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : आधी पराभव बघितले...आता इतिहास घडवण्याची वेळ; फायनलसाठी तयार हरमन ब्रिगेड, किती वाजता सुरु होईल सामना?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बनवणाऱ्या महेश मांजरेकरांना महाराजांबद्दल विचारले ४ प्रश्न; काय दिली उत्तरं? तुम्ही ठरवा योग्य की अयोग्य

Mumbai: महिलेचा स्कर्ट ओढणे आणि शिट्टी वाजवणे हा गुन्हाच...! मुंबईतील न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला सुनावली 'अशी' शिक्षा

Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

SCROLL FOR NEXT