Nawab Malik Sakal News
महाराष्ट्र बातम्या

माझ्यावरच्या कारवाईत माजी मुख्यमंत्र्यांना रस; मलिकांंचं नवं ट्विट

नवाब मलिक यांच्याकडे आज केंद्रीय यंत्रणांची धाड पडण्याची शक्यता आहे.

सुधीर काकडे

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे गेल्या काही दिवसांपासून फारच चर्चेत आहेत. त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आपल्यामागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागू शकतो याची कल्पना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्याबद्दल काल रात्री त्यांनी ट्विट करून एक नवी माहिती दिली होती. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांनी केंद्रीय यंत्रणांना (Central Agencies) सुचना देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

"केंद्रीय यंत्रणांना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात माजी मुख्यमंत्री खूप रस दाखवत आहेत. मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:ची ओएसडी म्हणून आणि किरीट सोमय्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी" अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता नवाब मलिकांनी (Nawab Malik) तिखट शब्दांत टीका केली आहे.

'उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत', अस सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केलं आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT