Ashok Chavan Joining BJP Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Joining BJP: भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करतोय; पक्ष प्रवेशाआधी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Ashok Chavan Joining BJP Today: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते भाजप कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते भाजप कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये आज मी प्रवेश करणार आहे. आजपासून भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करतोय. दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पर्वाला मी सुरुवात करत आहे. (ex congress leader Ashok Chavan said Making a new political start with BJP today )

आज मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आता कोण काय बोलतंय हे मला बघायचं नाही त्यावरती मी नंतर बोलेल. आज पक्ष प्रवेश होईल. त्यानंतर उद्या सर्व गोष्टींवर मी सविस्तर बोलेन, असं चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण भाजप कार्यालयात रवाना झाले असून फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर बोलणे टाळले आहे. कालच्या गोष्टी आता सोडा असं ते म्हणाले आहेत. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावेळी अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करतील. काही आमदार देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांसोबत संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस हायकमांड हायअलर्ट झाले आहे.

अशोक चव्हाण यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता. दोन दिवसात आपण भूमिका स्पष्ट करु असं अशोक चव्हाण म्हणाले होते. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ते भाजपमध्ये जात आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT