Ashok Chavan Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Joins BJP: घाईघाईत घेतली 'एनओसी'! अशोक चव्हाणांची सुरू झाली राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी?

Hastily took 'NOC'! Ashok Chavan's preparation for the Rajya Sabha election has started: अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल(सोमवारी) अचानक काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर या प्रवेशाला राज्यसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेच्या उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत. राज्यात ६ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये भाजपाकडून चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याकडे पाहिले जाते आहे.

त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली ती म्हणजे, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनोसी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. 12,300 रुपयांची थकबाकी भरून अशोक चव्हाण यांनी एनोसी प्रमाणपत्र काढले आहे. यामुळे चव्हाण यांना घाईघाईची एनओसी घेणं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळणारी एनओसी आवश्यक असते, उमेदवारी अर्जासोबत त्यांना एनओसी द्यावा लागतो. अशोक चव्हाण यांच्यावर नागपूरच्या रवी भवनाचे 12,300 रुपयांचे देयक होते. ते भरून त्यांनी एनओसी काढल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT