Exam  Sakal
महाराष्ट्र बातम्या

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ढकलल्या पुढे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मीनाक्षी गुरव

पुणे : ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra Health Science University) घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Exam Postponed) आल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा २८ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार होत्या.

राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. या विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT