Uday-Samant 
महाराष्ट्र बातम्या

युजीसी'च्या शिफारशी नंतर परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रक ठरणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगासह राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र या दोन्ही समितींच्या शिफारशींंध्ये भिन्नता असल्यास त्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यासाठी 'यूजीसी'चा अहवाल आल्यानंतरच राज्य शासनाकडून याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत समितीच्या बैठकीत एकमत झाले अाहे. 

लाॅकडाऊनमुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत, परीक्षा कधी घेणार, कशा घेणार यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून विचारणा होत असल्याने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक आणि तंत्र शिक्षण संचालक यांची स्थापन केली आहे. ही समिती राज्य शासनाला परीक्षा व शैक्षणिक वर्षाबाबत अहवाल सादर करणार आहे. या यासंदर्भात समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात परीक्षा, सुट्टी तसेच शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक याबाबत चर्चा करण्यात आली. 

"विद्यापीठ अनुदान आयोगाने गठीत केलेल्या समितीने परीक्षा व शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक याचा अहवाल अद्यापपर्यंत सादर झालेला नाही. त्यामुळे युजीसीने अहवाल केंद्र शासनास सादर केल्यानंतर त्याच्या शिफारशी व राज्यस्तरीय शिफारशींच्या आधारे परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे," असे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले. 

दरम्यान, 'यूजीसी'ने शुक्रवारी नोटीस जाहीर करून परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रक ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच सादर होईल, त्यानुसार सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना सूचना दिल्या जातील असे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT