mpsc exam 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! एमपीएससीची 21 ऑक्‍टोबरपूर्वी परीक्षा

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करावी लागली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयातील प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षा कक्षात ठेवण्यास एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे त्या मुदतीपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा होणार, हे निश्‍चित झाले आहे. 


एमपीएससीची परीक्षा 5 एप्रिलला घेण्याचे नियोजन असल्याने जिल्हा कोषागार कार्यालयांमधील सुरक्षा कक्षात सीलबंद ठेवलेल्या प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकांची मुदत 31 एप्रिलपर्यंतच होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलल्याने त्या सुरक्षित राहाव्यात, यादृष्टीने एमपीएससीने मुदतवाढीचे पत्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहेत. दरम्यान, राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून त्यापैकी बहूतांश विद्यार्थी मूळगाव सोडून पुणे, मुंबईत भाड्याने राहत आहेत. वर्षभर अभ्यास करुनही यंदा एमपीएससीची नियोजित परीक्षा कोरोनामुळे दोनदा पुढे ढकलावी लागली. मात्र, आता विद्यार्थ्यांची मागणी, एमपीएससीने परीक्षेची केलेली तयारी अन्‌ युपीएससीचे जाहीर झालेले वेळापत्रक, या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरपूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले आहे. आगामी 15 दिवसांत त्याचे वेळापत्रक जाहीर होईल, असा विश्‍वासही अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. 

25 हजार विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा 
एमपीएससीने यापूर्वी 420 पदांसाठी राज्येसेची परीक्षा घेतली असून उत्त्पादन शुल्क विभागाच्या 33 उपनिरीक्षक पदांची परीक्षा मागच्या वर्षी झाली आहे. तसेच 179 लिपीक टंकलेखक, 126 कर सहायक, 16 विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि एक हजार 146 स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची परीक्षा होऊनही निकाल लागलेला नाही. एमपीएससीने तत्काळ निकाल जाहीर करावा म्हणून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, आमदारांना निवेदने दिली असून ट्विटरवर एमपीएससी रिझल्ट अशी मोहीमही सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर जुलै-ऑगस्टपर्यंत मागील परीक्षांचे निकाल आणि नव्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे नियोजन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एमपीएससीचे आगामी नियोजन... 

  • दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्यादृष्टीने प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकांची तयारी 
  • कोषागार कार्यालयांमधील सुरक्षा कक्षात 21 ऑक्‍टोबरपर्यंत प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका ठेवण्यास परवानगी 
  • युपीएससी अन्‌ केंद्र व राज्य सरकारच्या अन्य परीक्षांच्या तारखा वगळून वेळापत्रकाची निश्‍चिती 
  • सोशल डिस्टन्समुळे पुरेशा प्रमाणात परीक्षा केंद्रे उपलब्ध होतील, परीक्षा केंद्रे बदलण्याचीही तयारी 
  • राज्य सेवेची पूर्व परीक्षा अन्‌ पोलिस उपनिरीक्षक पदांची होणार परीक्षा: प्रलंबित निकाल लवकरच होणार जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT