Exam 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : सहावी ते आठवीपर्यंतच्या परीक्षाही रद्द

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय विद्यालयांच्या सहावी ते आठवीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे. हा निर्णय केंद्रीय विद्यालय संघटनेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने घेतला आहे.

केंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते पाचवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, काही भागांमध्ये सहावी ते आठवीच्या परीक्षा सुरू असल्याने त्यासंबंधी कोणता निर्णय घ्यायचा, यावर एकमत झाले नव्हते. उपायुक्त ए. पी. भल्ला यांनी मुंबई विभागीय कार्यालयाची बैठक बोलावली होती. त्यात सहावी ते आठवीच्या परीक्षेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. सहायक आयुक्त एस. पी. पाटील यांच्या सहीने यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

केंद्रीय विद्यालयांसाठी यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मूल्यमापनामध्ये ज्या मुलांना ‘ई’ श्रेणी मिळाली आहे, त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यासंबंधी पुढील सूचना मिळाल्यानंतर तारखा जाहीर करण्यात येतील. पहिली ते पाचवीचे निकाल २१ मार्चला, तर सहावी ते आठवीचे निकाल २४ मार्चला आॅनलाईन जाहीर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : यवतमाळात काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर फौजदारी; जिल्हाध्यक्षांसह २५ जणांवर गुन्हा

Delhi NCR PUC Rule : आजपासून 'पीयुसी' नसलेल्या वाहनांना पेट्रोल-सीएनजी मिळणार नाही; नंबर प्लेटवरून होणार तपासणी

SCROLL FOR NEXT