solapur excise

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

‘एक्साईज’ अधीक्षकांच्या सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर धाडी! थंडीत सकाळी सहा वाजता पथकांची कारवाई, ढाब्यांवरही ‘या’ कारणाने कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील बक्षी हिप्परगा परिसरातील वडजी तांडा व सीताराम तांडा हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. २१) धाडी टाकण्यात आल्या. सकाळी सहा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने धाडी टाकून तेथील १५ हजार १४० लिटर गुळमिश्रित रसायन व ३४५ लिटर हातभट्टी नष्ट केली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बक्षी हिप्परगा परिसरातील वडजी तांडा व सीताराम तांडा हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. २१) धाडी टाकण्यात आल्या. सकाळी सहा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने धाडी टाकून तेथील १५ हजार १४० लिटर गुळमिश्रित रसायन व ३४५ लिटर हातभट्टी नष्ट केली.

महापालिका निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. मागील दोन दिवसांत २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत १५ हजारांहून अधिक लिटर गुळमिश्रित रसायन, दीड हजार लिटर हातभट्टी, देशी-विदेशी दारू, बिअर, एक टेम्पो, चार दुचाकी, असा एकूण १८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास किंवा सायंकाळी या धाडी टाकल्या जात आहेत. ही कारवाई निरीक्षक ए. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे, समाधान शेळके, पंकज संपकाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

आठ ढाब्यांवरील ३२ जणांवरही गुन्हे

अवैधरीत्या मद्यविक्री करणाऱ्या व मद्य पिण्याची सोय करून त्यासाठी परवानगी देणाऱ्या आठ ढाबा चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात हॉटेल राजमुद्रा, हॉटेल गोकूळ, धनगरवाडा, के. के. मटण भाजनालय, हॉटेल अरहान अशा ढाबे, हॉटेल्सचा समावेश आहे. याशिवाय त्याठिकाणी मद्यपान एकूण २४ जणांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. आगामी काळात देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT