Raju Shetti and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी समितीतून वगळले; राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

रवींद्र देशमुख

कोल्हापूर - राज्याच्या ऊस दर नियंत्रण समितीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेत्यांना वगळण्यात आले आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा मुद्दा चर्चेत असतानाच शेट्टी यांना वगळण्यात आले.

राजू शेट्टी म्हणाले की, ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करा यासाठी आम्ही सरकारकडे एक वर्षं पाठपुरावा केला. अनेकवेळा आंदोलनेही केली. ही समिती अस्तित्वात नसल्यामुळेच, एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची क्षमता असून सुद्धा अनेक कारखान्यांकडून मागील वर्षातील अंतिम बिलं मिळाली नाहीत. कारण त्यांचा हिशोब करणारी ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नव्हती. यावर्षी हंगाम समाप्त होऊन दुसरा हंगाम तोंडावर आला, तरी समिती अस्तित्वात नव्हती.

दरम्यान यावर्षी अनेक कारखान्यांकडे एफआरपी देऊन ऊसाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. कारण साखरेला भाव आणि इथेनॉलमधून उत्पन्न मिळाले आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांवर अंकुश ठेवून त्यांचा हिशोब तपासून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सक्षम ऊस दर नियंत्रण समितीची आवश्यकता होती.

दुर्दैवाने कागदी घोडे नाचवून अत्यंत दुबळी अशी ऊस दर नियंत्रण समिती निर्माण केली आहे. ज्या समितीमध्ये मी, रघुनाथ पाटील, विक्रमसिंह घाडगे, बी.बी. ठोंबरे यांच्यासारखे एकपेक्षा एक दिग्गज आम्ही काम करत होतो. मात्र आता दुबळ्या समितीची निर्मिती करून सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचं शेट्टी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT