Kirit Somaiya Kirit Somaiya
महाराष्ट्र बातम्या

अनिल परबांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील दोन प्रमुख मंत्र्यांवर आरोप केले आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली आहे. त्यांनी म्हटलंय की, लोकायुक्तांच्या सुनावणीत हे सिद्ध झालंय की, मंत्री अनिल परब यांनी फसवणूक केली आहे. फसवणुकीने रत्नागिरीमधील दापोली येथील समुद्र तटावर 17800 स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं आहे. या आरोपानंतर अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या भ्रष्टाचारासंदर्भात लोकायुक्त, राज्यपाल, राष्ट्रीय हरीत लवादा (National Green Tribunal), दापोली पोलीस स्टेशन आणि पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार अशा विभिन्न विभागात तक्रार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. असं असूनही अनिल परब यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

काय आहे आरोप?

किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केलं आहे. त्यामध्ये अनिल परब यांच्या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दोन चौकशींमध्ये सुद्धा आढळून आलंय की, नगर रचना विभागानं सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही. याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं गेलं होतं. ते पत्र अनिल परब यांचे सहकारी मित्र अधिकाऱ्यांनी महसूल कार्यालयाच्या फाईलमधून गायब केलं होतं" असा आरोप देखील त्यांनी केला आहे. अनिल परब मंत्रिपदावर असताना या प्रकरणाबाबत निर्दोष आणि निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे अनिल परबांची हकालपट्टी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : कारवाईच्या बहाण्याने घरात घुसले, २० लाखांसह १५ तोळे सोन्याची चोरी; चार पोलिसांना अटक

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

Pune Crime: श्रीरामपूरमधील जप्त अमली पदार्थाची विक्री; पाच आरोपी ताब्यात १० किलो ७०७ ग्रॅमचा माल, वाहने हस्तगत!

रिस्क नको, BMCमध्ये सत्तेसाठी भाजप-शिवसेनेच्या सावध हालचाली; महायुती म्हणून नोंदणी करणार, अखेरच्या क्षणी निर्णय बदलला

SCROLL FOR NEXT