Ashish Deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Deshmukh: नितीन गडकरींसोबतच्या भेटीत आशिष देशमुखांच्या घरवापसीचा 'मुहूर्त' ठरला

काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख भाजपमध्ये करणार प्रवेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसचे निलंबित आमदार आशिष देशमुख यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी आशिष देशमुख यांचा घरवापसीचा मुहूर्त ठरला आहे. उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Latest Marathi News)

पक्षातील नेत्यांच्या आणि पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली होती. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.(Latest Marathi News)

आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपाची दखल काँग्रेस पक्षाने घेतली. देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. काँग्रेसमधून निलंबित करण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.(Latest Marathi News)

तर या भेटीगाठीनंतर आशिष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान ते भाजपकडून सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT