Ajit Pawar NCP Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : जाहिरातबाजी, मंत्र्याचे उद्योग CM एकनाथ शिंदेंना नडले? भाजपानी नवा मित्र शोधला, कारण...

नव्या सत्ता समीकरणांतून शिंदे गटाला ‘साइडलाइन’ करण्याचा खेळ भाजपने खेळल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकप्रियतेचे मोजमाप, त्याची जाहिरातबाजी, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिणवणे, मंत्री आमदारांना वाटेल तसा, वाटेल तेवढ्या निधीची खैरात, मुंबईत मनमानी, बड्या बिल्डर, ठेकेदारांशी सलगी, संभाव्य जागावाटपावर वाद आणि सरकार म्हणून छाप पाडण्यातील अपयश...

अशा डझनभर कारणांनी शिवसेनेपासून (शिंदे गट) चार हात लांब राहण्याचा पवित्रा घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत भाजपने सत्तेसाठी नवा मित्र शोधल्याचे स्पष्ट आहे.

नव्या सत्ता समीकरणांतून शिंदे गटाला ‘साइडलाइन’ करण्याचा खेळ भाजपने खेळल्याचे उघड आहे.

परिणामी, भाजपच्या जुळवाजुळवीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक मंत्री, आमदारांच्या पोटात गोळाच आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्षपूर्तीच्या तोंडावरच कुरबुरी वाढल्याचे उघडपणे दिसून आले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या लोकप्रियतेची पहिली जाहिरात आणि त्यावरून भाजपच्या साऱ्यांच नेत्यांमधील पसरलेली नाराजी लपून राहिली नाही. त्याआधी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भाजप-शिंदेंच्या मंत्र्यांतील चढाओढ,

त्यातील अर्थकारण, शिंदे यांच्या मंत्री, आमदारांचा प्रशासनातील नको तेवढा हस्तक्षेप, विशेषतः मंत्र्यांची ‘वर्किंग स्टाइल’ हे भाजप डोळ्यांवर आली होती. शिंदे यांच्या निधीवाटपाच्या सपाट्यावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरील भाजप नेत्यांचा डोळा, एका पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीचा वाद, त्यानंतरची श्रीकांत शिंदे यांची निवडणूक न लढविण्याची तयारी यावरूनही सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस पाहायला मिळाली.

सरकारमध्ये चुकीच्या बाबींचा परिणाम होऊन निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची भीती भाजपच्या काही नेत्यांनी नेतृत्वाकडे बोलून दाखविल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारमधील मित्रपक्ष म्हणून निवडणुकांत शिवसेनेचा फारसा फायदा होण्याची आशा नसल्याचेही भाजपच्या पाहणीतून पुढे असल्याचे काही नेते सांगत आहेत. अशा स्थितीत बहुमत असूनही जोखीम नको, म्हणून भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्याचा उतारा शोधला आहे.

मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा

सरकारकडे पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाची साथ घेतल्याचा डाव शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना रुचला नसल्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात स्पष्टपणे दिसत होते.

राष्ट्रवादीतील फूट, सरकारमध्ये बदल, लगेचच शपथविधी झाल्याने मुख्यमंत्री शिंदे थोडेसे तणावात असल्याचे चित्र राजभवनातील कार्यक्रमात होते. या कार्यक्रमात नवे उपमुख्यमंत्री आणि मंत्री शपथ घेत असतानाही मुख्यमंत्री शिंदे बराच वेळ आपल्या मोबाईलमध्येच डोकावून होते. एखाद्या जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच मुख्यमंत्री एवढा वेळ मोबईलमध्ये पाहात असल्याचे दिसले. त्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा रंगली.


शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा असतानाच रविवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठका सुरू झाल्या. त्यामुळे विस्तार होणार असल्याचा विश्वास दोन्ही गटांतील आमदारांत होता.

मात्र, त्यानंतर तासा-दीड तासांतच शिंदे, फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज राजभवनाकडे निघाली आणि पवार उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा पसरली. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्थता वाढली. मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचे पाहावे लागले. त्यानंतर आमदारांनी एकमेकांना फोनाफोनी करीत, नाराजीचा सूर लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT