solapur crime sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजेविरूद्ध खंडणीचा गुन्हा! ठेकेदाराला 11 लाख रूपये दे, नाहीतर टेंडर मागे घे म्हणून मारहाण; ‘डीसीपीं’ची रात्री उशिरा पोलिस ठाण्याला भेट

शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे, नाहीतर मला १५ टक्क्याप्रमाणे ११ लाख रूपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहायक अभियंत्याच्या कार्यालयातच शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे, नाहीतर मला १५ टक्क्याप्रमाणे ११ लाख रूपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहायक अभियंत्याच्या कार्यालयातच शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आकाश उत्तम कानडे (रा. बार्शी रोड, मानेगाव, वैराग, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. १ जुलैला मनीष काळजे याच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात व २ जुलैला महापालिकेचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीतील ठळक बाबी...

  • अभियंता दिपक रामचंद्र कुंभार यांच्या माध्यमातून १ जुलैला सात रस्ता येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले

  • अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामाची निविदा मागे घे किंवा वर्क ऑर्डर ७६ लाखांची असून १५ टक्क्यांप्रमाणे ११ लाखांची मागणी

  • फिर्यादी आकाश उत्तम कानडे यांनी नकार दिल्याने काळजे याच्याकडून दमदाटी व शिवीगाळ आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरविण्याची धमकी

  • फिर्यादी २ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांच्यासमवेत सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले

  • मनीष काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा त्याठिकाणी होता आणि त्याने काळजेला फोन करून मी तेथे आल्याची माहिती दिली

  • काहीवेळाने काळजे व त्याचा चालक तेथे आले, त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटा मारल्या

  • दिपक कुंभार म्हणाले, माझ्या कार्यालयात असे काही करू नका म्हणून बाजूला केले. त्यावेळी तु निविदा काढून घे किंवा मला दे नाहीतर तुला सोलापुरात राहू देत नसल्याची काळजेकडून धमकी

  • काळजेला नकार दिल्याने पुन्हा त्याने व त्याच्या चालकाने शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

डीसीपी कबाडे यांची रात्री उशिरा पोलिस ठाण्याला भेट

मंगळवारी (ता. २) दुपारी एक-दोनच्या सुमारास घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद कानडे यांनी सदर बझार पोलिसांत दिली होती. पण, रात्री अकरा वाजल्या तरीसुद्धा अद्याप फिर्याद तथा एफआयआर दाखल झाला नव्हता. त्यामुळे रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारून त्यांना सक्त सूचना केल्या व ते काहीवेळाने तेथून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT