chandrashekhar bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करणार; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - महाराष्ट्र भूषण, विदर्भ भूषण आणि नागपूर भूषण देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै म्हणजेच उद्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले की, त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर-पोस्टर कार्यकर्त्यांनी लावू नये. भाजपनेही पक्ष म्हणून फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याच ठरवल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

बावनकुळे म्हणाले की, जिथे-जिथे अतिवृष्टी झाली, तिथे भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, वैद्यकीय सेवा करतील आणि मदत करतील. मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सेवाकार्य सुरू आहे. उद्याचा संपूर्ण दिवस सेवादिन म्हणून पाळण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं.

तसेच फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णमित्र उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. पक्षाचे ५० हजार कार्यकर्ते २२ जुलै २०२४ पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी काम करणार आहेत. २८ हजार ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक आणि शहरी भागात प्रभागात एक असे ५० हजार कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून काम करणार आहेत. या अभियानाच्या संयोजकपदी डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.

शिवेसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतीच पालकमंत्र्यांनी मुंबईतील कार्यलय खाली करण्याचा इशारा दिला, त्यावर बावनुकळे म्हणाले की, अशा डरकाळ्या आपण अनेकवेळा ऐकलेल्या आहेत. हे फुसके बार आहेत. काँग्रेस पक्षात विसंवाद आहे. नेतृत्वाचं खच्चीकरण झालं आहे. विरोधीपक्षनेता कोण करायचा, हे ठरत नाही. विरोधीपक्षनेता केला की, तोच भाजपमध्ये जाईल, याची भीती असल्यामुळेच विरोधीपक्षनेता ठरेना, असा दावा बावनकुळेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT