sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

वैफल्यग्रस्त भाजपचा दंगलीचा कट

संजय राऊत : राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी कारस्थान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘‘वैफल्यग्रस्त भाजपकडून राज्यात दंगली घडविण्याचा कट रचला जात आहे. ‘नवहिंदुत्ववादी ओवेसीं’च्या भोंग्यांमुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण करायचे, मग खऱ्या ओवेसींनी येऊन राज्यात दंगे घडवायचे. लगेच राजभवनातून राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्याची ठोस माहितीदेखील मिळाली आहे,’’ असा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.

राऊत दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा दंगलीचा कट, शिवसेनेचा अयोध्येतील नियोजित कार्यक्रम आणि मीरा- भाईंदर महापालिकेतील स्वच्छतागृह गैरव्यवहार आदी मुद्दे उपस्थित केले. भोंग्याचे राजकारण कोल्हापूरकरांनी नाकारल्याचे आजच्या निकालातून दाखवून दिले आहे. जनतेने हे कारस्थान उधळून लावले आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजप आणि मनसेचे नाव न घेता मारला.

भोंग्याचे राजकारण आजच संपले

राऊत म्हणाले, ‘‘ज्यांनी भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापूर पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला अशा वेळी काही लोकांनी भोंगे लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनुकूल निकाल मिळविण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. कोल्हापूरकरांनी त्यांचे भोंगे निकालातून खाली उतरवले. भोंग्याचे राजकारण आजच संपले.’’

हनुमान आमच्याच पाठीशी

कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचे कारस्थान रचले जात आहे आणि त्याची माहितीही मिळाली आहे. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, अशा राज्यात दंगली घडवीत वातावरण अस्थिर करीत, निवडणुका जिंकण्याचा प्रकार देशात सुरू झाला आहे. हनुमान चालिसा घेत राजकारण करणाऱ्या तथाकथित हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी. त्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही. भीमरुपी वज्र हनुमान मारुती हा सदैव आमच्याच पाठीशी आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत १०० कोटींचा स्वच्छतागृह गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आयुक्तांचा तसा अहवाल आहे. माझ्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून महाशयांना अटक होईल.

- संजय राऊत, खासदार, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Trusts: टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

Indian Air Force Day 2025: किती शक्तीशाली आहे भारतीय वायुसेना, 'या' दहा मुद्द्यांद्वारे जाणून घ्या

INDU19 vs AUSU19 : ५-०! जे सिनियर्सना नाही जमलं, ते ज्युनियर्सनी केलं; ऑस्ट्रेलियाला घरात घुसून लोळवलं, रचला इतिहास

SCROLL FOR NEXT