Failed Students Party esakal
महाराष्ट्र बातम्या

Failed Students : नापास विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टी; आयुक्तांच्या उपक्रमाचं राज्यभर कौतुक

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः जिल्ह्यातील नापास विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचं आयोजन छत्रपती संभाजी नगरमध्ये करण्यात आलेलं आहे. आयुक्तांच्या या उपक्रमाचं राज्यभरात कौतुक होत आहे.

दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर अपयश आलं तर ऐन उमेदीत पदरी नैराश्य येतं. त्यामुळे अंगभूत कौशल्यांवरही दुष्परिणाम होतो. या विद्यार्थ्यांना उभारी देण्याचं काम करणं आवश्यक असतं.

हाच विचार घेऊन छत्रपती संभाजी नगरचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. 'फेल्युअर पार्टी' असं नाव या पार्टीला देण्यात आलेलं आहे. येत्या ६ जून रोजी ही पार्टी संपन्न होणार आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण धोक्यात येऊन त्यांच्या स्किलवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना या काळात मार्गदर्शन आणि नवीन उभारी मिळावी, यासाठी पाठीवर थाप मारून 'तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची' असा विश्वास निर्माण करण्याची गरज असते. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १३,८३६ नापास झालेले किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचं आयोजन केलेलं आहे.

६ जून रोजी सकाळी १० वाजता सिडको एन-५ येथील लाइट हाऊस, धर्मवीर संभाजी शाळेच्या शेजारी फेल्युअर पार्टीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महापाविका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या या उपक्रमाचं राज्यभरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT