Marriage Sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्याच्या मुलीचा शाही विवाह! कुत्रे, मुंग्या पशुपक्षांच्याही झाल्या पंगती; 10 हजार लोकांना निमंत्रण | Marriage

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचा शाही विवाह केला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने थेट पाच गावातील १० हजार लोकांना जेवायला बोलावून पंगत घातली आहे. त्याचबरोबर या शाही विवाहामध्ये पशुपक्षी आणि मुंग्यांनाही पंगतीमध्ये जेवण दिलं आहे. हा शेतकरी अल्पभूधारक असून त्याने केलेल्या शाही विवाहाची चर्चा पंचक्रोशीत आहे.

आपल्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यात कुणीच उपाशी राहू नये यासाठी प्रकाश सरोदे या शेतकऱ्याने विशेष काळजी घेतली आहे. यासाठी जनावरांना १० ट्रॉली सुका चारा, परिसरातील श्वानांना जेवण आणि मुंग्याही उपाशी राहू नयेत यासाठी या शेतकऱ्याने चक्क साखरेचे पोते मुंग्यांसाठी टाकले आहेत.

आमची परिस्थिती गरीब असताना आमच्या वडिलांनी शाही पद्धतीने विवाह लावून दिला. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलं अशी भावना नवरीने व्यक्त केली. तर ही इच्छा माझ्या आईवडिलांची होती. आमच्या मुलीच्या लग्नात कुणीच उपाशी राहू नये अशी इच्छा होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून या विवाहाची तयारी सुरू आहे असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT