INDIA Meeting Sakal
महाराष्ट्र बातम्या

वावरातले शेतकरी INDIA Meetingमध्ये, थेट नांगरासकट! 7 दिवस चालत पोहोचले मुंबईमध्ये

दत्ता लवांडे

मुंबई : आज आणि उद्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे होणार आहे. यासाठी देशभरातील ११ राज्यातील मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित राहिले आहेत. महाविकास आघाडीने या बैठकीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी राजस्थान येथून किसान महापंचायतचे शेतकरी हातामध्ये नांगर घेऊन हजर झाले आहेत.

शेतकऱ्यांना हमीभाव द्या, एम एस पी बाबत कायदा तयार करा... या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाने याची दखल घ्यावी आणि या मागण्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी सगळे शेतकरी राजस्थानहून मुंबईत दाखल झाले आहेत. आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे निवेदन देऊन किसान पंचायतचे शेतकरी पुन्हा राजस्थानला रवाला होणार आहे.

दरम्यान, या बैठकीसाठी १०० हून जास्त शेतकरी दाखल झाले आहेत. हे शेतकरी २४ ऑगस्ट रोजी राजस्थानातून चालत मुंबईच्या दिशेने निघाले होते. तर आज ते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलला पोहोचले आहेत. पण या बैठकीमध्ये हातात नांगर घेऊन आलेल्या या शेतकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT