Farmer-Agitation 
महाराष्ट्र बातम्या

Video : कृषी शिक्षणातील स्पॉट अँडमिशन शिष्यवृत्ती बंद केल्याने शेतकरी पुत्रांचे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

शेती हा देशाचा अविभाज्य घटक आहे. यामध्ये आता शेतकरी पुत्र व्यावसायिक शेतीचे शिक्षण घेऊन आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राज्यात कृषी शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी स्पॉट अँडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधी सुहास तरंगे, अजिंक्य सुरवसे यांच्यासह विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या पुण्यातील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी शेतकरी पुत्रांनी परिसर दणाणून सोडला. तर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील चार विद्यापिठांची मिळून १८७ महाविद्यालये राज्यभरात आहेत आणि त्यात तब्बल १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. दुसरीकडे शेतकरी राजधानीत आंदोलन करत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात हे शेतकरी पुत्रांवर अन्याय करण्याचे धोरण शासन राबवत असेल तर हा कृषी प्रधान देश कसा म्हणायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT