Farmers eyes pain in Vidarbha-Marathwada 
महाराष्ट्र बातम्या

विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पडदा!

नेत्वा धुरी

मुंबई -  दुष्काळाने करपलेले रान पाहून पाणावलेल्या, पावसाची वाट पाहून थकलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांना आता वेगळ्याच दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. घाम आणि धूळीमुळे डोळ्यांच्या बुब्बुळांवर पडदा निर्माण होण्याचा विकार या भागात वाढत आहे. उन्हातान्हात खपणारे शेतकरी आणि धूळभरल्या वाटांवरून प्रवास करणारे मोटारसायकल चालक यांच्यात हा विकार प्रामुख्याने दिसत आहे.  

नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या आठवड्यात बीडमध्ये घेतलेल्या नेत्रतपासणी शिबिरात त्यांना असे रुग्ण आढळले. नेत्रविकाराच्या सुमारे पाच टक्के रुग्णांमध्ये हा विकार दिसून आला आहे.  हा विकार प्रामुख्याने ३० ते ५० वयोगटातील नागरिकांमध्ये दिसून येतोे. या वयोगटातील व्यक्तींचा खुल्या जागेत जास्त वावर असतो. त्यामुळे त्यांना ही व्याधी होत असल्याची शक्‍यता आहे. नागपुरच्या सरकारी रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान म्हणाले, नेत्रचिकीत्सा विभागात दिवसाला ३०० रुग्ण येतात. त्यापैकी १५ रुग्णांमध्ये ही समस्या दिसते. शेतकऱ्यांचा दिवसभर थेट उन्हाशी संपर्क येतो. त्यातच विदर्भात धुळीचे प्रमाणही जास्त असल्याने शेतकऱ्यांत हा विकार आढळतो.

‘बीडमधील शिबिरात सात हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ३५० जणांच्या बुबुळावर पडदा असल्याचे आढळले. या सर्वांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
- डॉ. तात्याराव लहाने, प्रभारी संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचनालयालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT