esakal
महाराष्ट्र बातम्या

अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर; 'करमुक्त' दाव्यांची होणार छाननी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा जोरात सुरु आहे. ईडी, सीबीआय, आयटीच्या धाडी सातत्याने सुरु असतानाच आता शेतकरीही त्यांच्या रडारवर असणार आहे. आता शेतकऱ्यांवरही आयकर विभागाची नजर असणार आहे. अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. त्यांच्या 'करमुक्त' दाव्यांची छाननी होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची माहिती आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे. १९६१ च्या आयकर कायद्यातील कलम १० (१) नुसार शेतीचं जे उत्पन्न आहे, ते करमुक्त करण्यात आलं आहे. तेंव्हाची गरज पाहता ते करमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, यातून गैरफायदा घेण्यात आल्याचे प्रकार आढळून येत आहेत. तेलंगणातील एका शेतकऱ्याने एक कोटी नऊ लाखाचे उत्पन्न घेतल्याचं दाखवलं आहे.

वित्त विभागाचा संशय आहे की, शेतीचं उत्पन्न दाखवून करातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यामुळेच वित्त विभागाच्या लेखा समितीनं असं ठरवलं आहे की, ज्यांचं उत्पन्न दहा लाखांहून अधिक दाखवलेलं आहे, त्यांच्या उत्पन्नांची आयकर विभागाकडून छाननी केली जाईल. त्याच्यातून हे जाणून घेतलं जाईल की खरंच हे शेतीचं उत्पन्न आहे का? या उद्देशाने आता ही तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ धन धना धन! एकाच दिवसात 3,000 रुपयांचा नफा? अलॉटमेंट फायनल; पाहा GMP, लिस्टिंग प्राइस आणि महत्त्वाचे अपडेट्स

IND vs NZ 3rd T20I : भारत-न्यूझीलंड तिसरा सामना किती वाजता सुरू होणार? फ्री मध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या डिटेल्स

Vidarbha Weather: थंडीचा जोर वाढतोय; पारा १६ अंशांवर; विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात; आधी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणार

IND vs NZ 3rd T20: विजयाचे 'वारे' भारताच्या दिशेने? सलग तिसऱ्या विजयासह न्यूझीलंडविरूद्ध मालिका जिंकण्याची संधी

SCROLL FOR NEXT