MSEDCL esakal
महाराष्ट्र बातम्या

ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी वेटिंग लिस्ट! चालू बिल भरण्याची ‘महावितरण’ची शेतकऱ्यांना अट

कांद्याची रोपे, टोमॅटो, भाजीपाल्यासह फळबागांना पाण्याची गरज आहे. तशातच महावितरणचा ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना चालू बिल भरण्याची अट घालण्यात आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जून महिन्यात काहीच पाऊस झाला नाही. जुलैमध्ये पाऊस पडला, पण ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कांद्याची रोपे, टोमॅटो, भाजीपाल्यासह फळबागांना पाण्याची गरज आहे. तशातच महावितरणचा ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना चालू बिल भरण्याची अट घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांत पावसाने ओढ दिली आहे. उजनी धरण १०० टक्के भरले आहे, पण पावसाळा सुरु असल्याने पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील स्रोतातून (बोअर, विहीर) पाणी द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या अनेक ट्रान्स्फार्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. महावितरणकडून त्याची तत्काळ दुरुस्ती होत नाही. सोलापूर महावितरणअंतर्गत पाच विभाग आहेत. त्याठिकाणी बिघडलेल्या ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे, हे विशेष. तरीदेखील, दररोज पाच ते सात ट्रान्स्फार्मर दुरुस्त केले जात आहेत. महावितरणकडून बिघडलेल्या ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने शेतकऱ्यांनीच पैशांची जुळवाजुळव सुरु केली आहे.

केवळ चालू बिले भरावीत, अशी अट आहे

नादुरुस्त ट्रान्स्फॉमर शेतकऱ्यांना दुरुस्त करून दिला जात आहे. त्यासाठी केवळ चालू बिले भरावीत, अशी अट आहे. सोलापूर कार्यालयाशी संलग्नित पाच विभाग असून दररोज किमान पाच ते सात ट्रान्स्फॉमर दुरुस्त करून दिले जात आहेत.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

नऊ दिवसांपासून पाऊसच नाही
जिल्ह्यातील २० ऑगस्टपासून पाऊस पडलेला नाही. जुलैमध्ये चार तालुक्यात चांगला पाऊस झाला, पण पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस व मोहोळ (शेटफळसह तालुक्यातील काही भाग) या तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर या पिकांसह अन्य पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीतून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT