farmer-suicide-amravati संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र बातम्या

चिंताजनक! ५ महिन्यात राज्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Maharashtra Assembly Winter Session 2021 : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची (Farmers Suicide) आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आली आहे. त्यानुसार जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत तब्बल १०७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2021) विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ही माहिती सभागृहाला दिली. विशेष म्हणजे या प्रकरणातील ४११ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (farmer suicide)

आस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांनी नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कारणांमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात सरकारने काय उपाययोजना केल्या असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. यावेळी उत्तरामध्ये वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती चिंताजनक आहे. यावर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत १०७६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. जिल्हापातळीवरील समितीने यातील ४११ घटनांना पात्र ठरवलं असून इतर २१३ प्रकरणं अपात्र ठरली आहेत. तर ३७२ प्रकरणांची चौकशी अजून सुरू आहे.

यावरील उपाययोजनांची माहिती देताना सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना समुपदेशनाची आणि प्रबोधनाची आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच मदतीसाठी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी समृद्धी योजनेतून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT