Farmer Sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार एकदम ६००० रुपये! रब्बी संपत आला तरी ९० लाख शेतकरी ‘खरीप’चा पीकविम्याच्या प्रतीक्षेत, वाचा...

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक वाया गेले तर आधार मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख २९ हजार ३९९ शेतकऱ्यांसह राज्यतील ९० लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकाचा विमा उतरविला. विम्यापोटी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी १८ कोटी १८ लाख ७० हजार रुपयांचा हिस्साही भरला. पण, आता रब्बी हंगाम संपत आला, तरीदेखील खरीप हंगामातील विम्याची रक्कम मिळाली नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे पीक वाया गेले तर आधार मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख २९ हजार ३९९ शेतकऱ्यांसह राज्यतील ९० लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकाचा विमा उतरविला. विम्यापोटी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी १८ कोटी १८ लाख ७० हजार रुपयांचा हिस्साही भरला. पण, आता रब्बी हंगाम संपत आला, तरीदेखील खरीप हंगामातील विम्याची रक्कम मिळाली नाही. अजूनही कांदा व तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरुच असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक ८७ हजार १३४ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यापाठोपाठ अक्कलकोट तालुक्यातील ६५ हजार २०४ शेतकऱ्यांनी आणि मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माढा या तालुक्यांतूनही २९ ते ३५ हजार शेतकऱ्यांनीही विमा उतरविला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५२ कोटी रुपये विम्यातून मिळतील, असा अंदाज आहे. दरम्यान, आतापर्यंत मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे पीक कापणी प्रयोग झाले आहेत. अपेक्षित व उंबरठा उत्पन्नाचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. तर कांदा व तूर पिकांचे पीक कापणी प्रयोग काही दिवसांत होतील. त्यांचाही अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.

परंतु, जिल्ह्यातील विमा उतरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल असे नाही. तसेच तालुक्यातील विमा उतरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांनाही विम्याची भरपाई मिळणार नाही. काही तालुके किंवा तालुक्यातील ठराविक मंडलांमधील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी निकषांनुसार विमा मिळेल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्यांनी पाठविलेल्या माहितीची पडताळणी केंद्र शासनाकडून सुरु असून काही दिवसांत पीकविमा मिळेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सन्मान निधीचे ६००० रुपये एकदम

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकऱ्यांसह राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांना प्रत्येक तीन महिन्याला केंद्र व राज्य सरकारकडून सन्मान निधीचे प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. परंतु, केंद्र सरकारकडून २२ वा हप्ता (प्रत्येकी २००० रुपये) अजून मिळालेला नाही. दुसरीकडे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा व नववा हप्ता (दोन्ही हप्त्याचे मिळून ४००० रुपये) देखील मिळालेला नाही. दरम्यान, केंद्र सरकारचा हप्ता मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून दोन्ही हप्ते एकदम वितरित होतील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

Dharashiv News : गूढ आवाजांमुळे धाराशिव जिल्हा ग्रामस्थांत भीती, मात्र प्रशासन सतर्क; भूकंपाची अधिकृत नोंद नाही

Manchar News : इंडिगोची ‘१० मिनिटांची मनमानी’, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील ५० प्रवाशांचे लाखोंचे नुकसान; २३ तासांचा नरकप्रवास!

YouTube update : 'यूट्यूब'ने भाषेचा अडसर केला दूर! आता २७ भाषांमध्ये व्हिडिओ डब करता येणार

WPL 2026 Final: जेमिमाहची विक्रमी फिफ्टी, हरमनप्रीतच्या पंक्तीत स्थान; दिल्लीकडून RCB च्या गोलंदाजांची धुलाई, २०० धावाही पार

SCROLL FOR NEXT