mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

राज्यातील शेतकऱ्यांना २०१७ मध्ये दीड लाखांची तर २०१९ मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. सद्य:स्थितीत राज्यातील २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे बॅंकांची ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने २०१७ मध्ये दीड लाखांची तर २०१९ मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. सद्य:स्थितीत राज्यातील २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे बॅंकांची ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा केला जाणार आहे.

अतिवृष्टी, महापूर, नापिकी, कांदा, सोयाबीन, तूर, फळे, भाजीपाल्यांनाही दर नाही. शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकरकमी मिळत नाही. अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या होतात, असे मदत व पुनर्वसन विभागाकडील आडकेवारीतून दिसते. त्यात नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर विभागात सर्वाधिक प्रमाण आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरता यावे, वारंवार बॅंकांची थकबाकी वाढण्याचे कारण काय, आता कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल, अशा बाबींवर समितीचा अभ्यास सुरु आहे. १० एप्रिलपर्यंत ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईल. सध्या समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून १७ मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागविली आहे. त्यानुसार किती शेतकऱ्यांकडे पीककर्ज, अल्प, मध्यम व दिर्घ मुदतीचे कर्ज किती आहे, हे समोर येणार आहे.

३० जूनपूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागविली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे.

- दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

  • १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी

  • जिल्हा थकबाकीदार शेतकरी थकबाकी

  • सोलापूर २,७१,९७३ ३,९७६ कोटी

  • जालना १,७२,६४८ १,९९२ कोटी

  • बुलढाणा १,६७,२७३ १,४७१ कोटी

  • नांदेड १,६५,३१२ १,२६८ कोटी

  • यवतमाळ १,५२,५६१ २,४२२ कोटी

  • परभणी १,५२,२०७ १,५०० कोटी

  • बीड १,१९,१८८ १,४६४ कोटी

  • अमरावती १,१७,४०२ १,३६० कोटी

  • छ.संभाजीनगर १,०४,५२९ १,६०० कोटी

  • वर्धा ९३,५३२ ९८३ कोटी

  • नाशिक ८१,७९७ २,८२९ कोटी

  • धाराशिव ५२,७१६ १,०९३ कोटी

शेतीकर्जाच्या थकबाकीची सद्य:स्थिती

  • एकूण शेतकरी

  • १,३३,४४,२०९

  • एकूण कर्जवाटप

  • २,७८,२६५ कोटी

  • थकबाकीदार शेतकरी

  • २४,७३,५६६

  • एकूण थकबाकी

  • ३५,४७७ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant संतापले! २००९चा खटला अजूनही अडकलेला... देशभरातील न्यायव्यवस्थेला दिला आदेश, पुढे काय होणार?

Marathi Breaking News LIVE: दिल्ली रात्रीचे विमान उड्डाण सलग दुसऱ्या दिवशी रद्द; प्रवाशांचे हाल वाढले

Pune–Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्ग वर्षभरात पूर्ण होणार, नितीन गडकरी यांनी दिला शब्द; रिलायन्सचे काम काढून घेतल्याचीही माहिती

जुई गडकरी की तेजश्री प्रधान! संपत्तीमध्ये कोण आघाडीवर? नेट वर्थच्या रेसमध्ये सायली की, स्वानंदी, कोण आहे पुढे?

Karad Crime: 'चाेरीप्रकरणी शिक्षकासह दाेघांना अटक'; ढवळेश्वर येथून १६ ताेळे हस्तगत

SCROLL FOR NEXT