महाराष्ट्र बातम्या

११ वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, प्रवेशासाठी शेवटची संधी

पूजा विचारे

मुंबई: ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ही मुदतवाढ 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत असणार आहे. 

Participat in FCFS मधून अर्ज करणे आणि allotment घेणे. 16 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. तसंच मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणारेय. 

त्यानंतर Allotment मिळालेल्या मुलांना आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करावा लागेल. प्रवेश निश्चित देखील त्याच दिवशी करायचे आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यालयात जाऊन विद्यार्थी प्रक्रिया करु शकणार आहेत.

तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा असल्यास विद्यार्थी उद्यापर्यंत म्हणजे 15 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो रद्द करु शकतात. 

सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल, असं दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सांगितलं आहे.

FCFS 2.0 has been given extension in 11th online admission process

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT