zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांना अतिरिक्त होण्याची धास्ती! सप्टेंबरअखेरच्या आधारव्हॅलिड पटसंख्येवर होणार संचमान्यता; शिक्षकांना वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी देण्याचाही निर्णय

सरकारी व शासकीय अनुदानित शाळांमधील संचमान्यता ३० सप्टेंबरपर्यंतच्या पटसंख्येवर आधारित होणार आहे. सप्टेंबरअखेर शाळेत जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे, त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सरकारी व शासकीय अनुदानित शाळांमधील संचमान्यता ३० सप्टेंबरपर्यंतच्या पटसंख्येवर आधारित होणार आहे. सप्टेंबरअखेर शाळेत जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे, त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील संचमान्यता करण्याचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी काढले आहेत. यंदा सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती आता वेगवेगळी भरावी लागणार नाही. दोन्ही पोर्टलसाठी आता एकाच ठिकाणी माहिती भरता येणार आहे. हीच माहिती संचमान्यतेसाठी अंतिम असणार आहे. संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबरनंतरची पटसंख्या ग्राह्य मानली जाणार नाही. त्यामुळे शाळांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आदेशात नमूद आहे.

दरम्यान, संचमान्यता करताना सर्व वर्गातील विद्यार्थी वयानुरूप त्याच वर्गात प्रवेश घेतल्याची खात्री करावी, असेही स्पष्ट आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक शाळांच्या पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध तथा प्रमाणित असल्याची खात्री गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असेही शिक्षण संचालकांनी त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त शिक्षक वाढण्याची चिंता

यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली. त्यात प्रवेश घटल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शासकीय व अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे संचमान्यतेनंतर हजारोच्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांना मिळणार वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक (एससीईआरटी) डॉ. राहुल रेखावार यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे पत्र देण्यासंदर्भातील आदेश बुधवारी (ता. १०) काढले आहेत. त्यानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राकडून (डायट) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १४०० शिक्षकांना ३० सप्टेंबरपर्यंत पत्रे तथा आदेश वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर त्या सर्व शिक्षकांचा पगार वाढणार आहे. ज्यादिवशी सेवेत रूजू होऊन १२ वर्षे पूर्ण झाली त्या शिक्षकांना वरिष्ठ तर २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना निवड वेतनश्रेणीनुसार पगार वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

हा तर फक्त सामना! भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT