Uday Samant e sakal
महाराष्ट्र बातम्या

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीपर्यंतची फी माफ

शिक्षण घेत असतानाच्या सर्व प्रकारच्या फीमध्ये सवलत

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई, वडील किंवा पालकांचा मृत्यू झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

सामंत म्हणाले, "अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्याबाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

या शुल्कात मिळणार ५० टक्के सवलत

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल.

या महाविद्यालयांसाठी शिक्षण शुल्कात सवलत नाही

पण, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही. परंतू, इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT