पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमवारपासून मैदानी! कौशल्य चाचणीत ४० टक्के गुण बंधनकारक; जवळ ठेवा ‘ही’ कागदपत्रे

सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यावेळी उमेदवारांकडे शैक्षणिक कागदपत्रे, आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन, अजाची छायांकित प्रत, कॉल लेटर अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस भरतीची तयारी आता अंतिम झाली असून, २ जानेवारीपासून (सोमवार) मैदानी चाचणीला सुरवात होणार आहे. शहर पोलिस दलाने पहिल्या दिवशी ६०० तर ग्रामीण पोलिसांनी २०० उमेदवारांना मैदानीसाठी बोलावले आहे. सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यावेळी उमेदवारांकडे शैक्षणिक कागदपत्रे, आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन, अजाची छायांकित प्रत, कॉल लेटर अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

शहर व ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत चालकांची १०१ तर पोलिस शिपायांची १२४ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी एकूण १३ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरवातीला चालकांसाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. ग्रामीण पोलिसांनी २ ते १० जानेवारीपर्यंत मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून ८ जानेवारीला (रविवारी) एक दिवस सुटी राहील. ग्रामीण पोलिसांकडे २८ चालक पदांसाठी एक हजार ४२२ तर २६ पोलिस शिपाई पदांसाठी एक हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाकडे ७३ चालक पदांसाठी पाच हजार ५५८ आणि ९८ पोलिस शिपायांसाठी सहा हजार ६२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलिस आयुक्तांनी १२ ते १६ जानेवारी या काळात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त परीक्षेला सुटी दिली आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होईल. संबंधित सर्व उमेदवारांना ‘महाआयटी’कडून प्रवेशपत्र वितरीत केले आहेत.

पोलिस चालक होण्यासाठी...

  • १) १६०० मीटर धावणे : दहापेक्षा अधिक गुण घेण्यासाठी ६.३० मिनिटे ते ५.१० मिनिटात अंतर पार करावे लागेल.

  • २) ८०० मीटर धावणे : महिला उमेदवारांनी हे अंतर ३.३० मिनिटे ते २.५० मिनिटांत पूर्ण केल्यास १० ते २० गुण मिळतील.

  • ३) गोळाफेक : दहापेक्षा अधिक गुण मिळविण्यासाठी पुरुष उमेदवारांना ७.३० मीटर ते ८.५० मीटर अंतरावर गोळा फेकावा लागेल. महिला उमेदवारांनी फेकलेला गोळा पाच ते सहा मीटरपर्यंत जायला हवा.

  • ४) कौशल्य चाचणी : जीप व व्हॅन प्रकारातील वाहन चालवून किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक

पहिल्या दिवशी ६०० नंतर दररोज ९०० जणांची चाचणी

२ ते २० जानेवारीपर्यंत चालक व पोलिस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील मैदानावर ही चाचणी घेतली जाणार असून, त्याची तयारी झाली आहे. पहिल्या दिवशी ६०० आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी ९०० उमेदवारांची मैदानी होईल.

- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT