पोलिस भरती Sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीसाठी फेब्रुवारीत मैदानी चाचणी! मे-जून महिन्यात होऊ शकते लेखी; सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये १७४ तर राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती, वाचा...

सध्या राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणची ९५ तर शहर पोलिसांची ७९ पदे आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत ७ डिसेंबरला संपली असून, आता अर्जांची छाननी सुरू आहे. या उमेदवारांची फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाकडून केले जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणची ९५ तर शहर पोलिसांची ७९ पदे आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत ७ डिसेंबरला संपली असून, आता अर्जांची छाननी सुरू आहे. या उमेदवारांची फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाकडून केले जात आहे.

पोलिस भरतीत सशस्त्र पोलिस, कारागृह शिपाई, पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड्‌‌समन अशा पदांचा समावेश आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, ८०० व १००० मीटर धावणे असे प्रकार असतात. मैदानीत गोळाफेकसाठी उमेदवारांना तीन संधी मिळतात. त्यापैकी सर्वाधिक लांब फेकलेल्या गोळ्याचे गुण दिले जातात. पुरुषांसाठी ७.२६ किलो वजनाचा तर महिलांसाठी ४ किलो वजनाचा गोळा असतो. मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारास किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहेत. त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी दहा उमेदवार मैदानी चाचणीसाठी घेतले जातात.

दरम्यान, पोलिस प्रशिक्षण केंद्रांमधील नवप्रविष्ठ पोलिस उमेदवारांचे प्रशिक्षण मार्च २०२६ मध्ये संपणार आहे. तत्पूर्वी, मैदानी चाचणी पूर्ण होईल असे नियोजन गृह विभागाचे आहे. मैदानीनंतर लेखी परीक्षा पार पडल्यावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर साधारणत: जुलै महिन्यापासून नव्याने भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होऊ शकेल.

राज्यात एकाचवेळी ‘लेखी’

मैदानी चाचणीनंतर सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाचवेळी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी चाचणीसाठी निवड होईल. दरम्यान, उमेदवारांना अर्ज भरताना एका पदासाठी एकच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सध्या अर्जांची पडताळणी सुरू आहे.

शारीरिक चाचणीचे स्वरूप...

  • (पुरुष उमेदवार)

  • १६०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक (७.२६ किलो) : १५ गुण

  • एकूण गुण : ५०

  • ----------------------------------------------------

  • (महिला उमेदवार)

  • ८०० मीटर धावणे : २० गुण

  • १०० मीटर धावणे : १५ गुण

  • गोळाफेक (४ किलो) : १५ गुण

  • एकूण गुण : ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजपासून 'Under 19 Asia Cup' स्पर्धा, वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या कामगिरीवर लक्ष; भारत-पाकिस्तान सामना कधी?

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्र गारठला! थंडीचा कहर, आणखी किती दिवस राहणार थंडी; काय सांगतो हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : ३० नागपुरात तापमान 10 अंशावर, ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

Donald Trump : पाकिस्तानच्या ‘एफ-१६’ विमानांना अमेरिकेचे बळ

सूर्यमंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी काढणार! कोणार्कमध्ये ऐतिहासिक प्रक्रिया सुरू; सुरक्षेसाठी ब्रिटिशकाळात केला होता उपाय

SCROLL FOR NEXT