Scholarship Result esakal
महाराष्ट्र बातम्या

Scholarship Result : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; या ठिकाणी पाहा तुमचा रिझल्ट

5वी, 8वी स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल (Scholarship Result ) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता अखेर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

कसा पहाल शिष्यवृती परीक्षेचा निकाल ?

mscepune.in किंवा mscepuppss.in वर क्लिक करा.

होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.

आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.

त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.

इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.

राज्य परीक्षा परिषदेने 7 नोव्हेंबरला झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळेकडून गुण पडताळणीसाठीच्या अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून मंगळवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT