aurangabad Fighting  
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील- कदीर मौलाना हाणामारी (Video)

जगदीश पानसरे

औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे पाचशेहून अधिक समर्थक रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत. 

मतदानाच्या शेवटच्या टप्यात शहरातील कटकटगेट भागात मतदानातील वादातून राष्ट्रवादीचे मध्यमधील उमेदवार कदीर मौलाना आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात आधी वादावादी आणि नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी इम्तियाज जलील यांचे कपडे देखील फाटले होते. या प्रकारामुळे राष्ट्रवादी व एमआयएमचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. जोरदार घोषणाबीज सुरू झाल्याने पोलीसांनी तात्काळ जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. 

पण जमाव संतप्त झाल्याने पोलीसांची अतिरिक्त कुमक कटकटगेट भागात बोलावण्यात आली. दरम्यान, इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कटकटगेट भागात दाखल झाल्याने वातावरण अधिकच तापले. कदीर मौलाना यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना समजावण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

कटकट गेट परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणालाही  मारहाण झालेली नसून दोन गटामध्ये केवळ बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. शहरवासीयांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 
- डॉ. राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, औरंगाबाद

कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह शकडो कार्यकर्ते इकरा शाळेजवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला, परंतु अजूनही या भागात कार्यकर्ते आक्रमक असून पोलीसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT