Fill out special coupons and participate in Sakal drawing Competition contests for free.jpeg
Fill out special coupons and participate in Sakal drawing Competition contests for free.jpeg 
महाराष्ट्र

सकाळ चित्रकला स्पर्धा 2020 : विशेष कूपन भरा अन् स्पर्धेत विनामूल्य सहभागी व्हा! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येत्या 12 जानेवारीला (रविवारी) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होत असलेल्या 'पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड' प्रस्तुत आणि 'पॉवर्ड बाय' 'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड' 'सकाळ चित्रकला स्पर्धा 2020'मध्ये सहभागी होणाऱ्या वाचकांसाठी 'सकाळ' विशेष सवलत देत आहे. येत्या 8 व 9 जानेवारीला (बुधवार व गुरुवार) "सकाळ'च्या अंकात प्रसिद्ध होणारे विशेष कूपन भरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. 

गौरवशाली भारतीय परंपरा

स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. 
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी "सकाळ'च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल. 

Global Family Day 2020 : मुलगी भारतीय, मुलगा जपानी अन् खुललाय सुखी संसार...

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी 'आशिया बुक ऑफ रेकॉर्डस' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस' या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची "सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा' अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे 34वे वर्ष आहे. 

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना "सकाळ' सातत्याने राबवीत आहे. "मुले हेच आपले भविष्य आहे' हा "सकाळ'च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने "सकाळ'च्या वतीने मुलांसाठी "सकाळ एनआयई' आणि "सकाळ यंगबझ' यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. "सकाळ चित्रकला स्पर्धा' हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. 
स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चार गटांत स्पर्धा 
महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे. 
'गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी 
"गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी 
'गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी 
'गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी 
वेळ ः 'अ' व 'ब' गटांसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 
क' व 'ड' गटांसाठी सकाळी 9 ते 10.30 

असे व्हा सहभागी 
पर्याय 1

- तुमचा गट निश्‍चित करा. 
- 'सकाळ'च्याअंकामध्ये ता. 8 जानेवारी (बुधवार) व 9 जानेवारी (गुरुवार) या दिवशी प्रसिद्ध होणारे 'पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा 2020'विषयीचे एक कूपन कापून ते पूर्ण भरावे. 
- भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा 
- रविवार, ता. 12 रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा. 

पर्याय 2 
विशेष कूपन भरू न शकल्यास ​

- विशेष कूपन भरू न शकल्यास http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु.10 प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा 
- मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. 
- रविवार, ता. 12 रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT