ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! अर्थमंत्री पद अजित पवार गटाकडे जाणार?

हे खाते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असून त्या ठिकाणी नाव लिहिण्यात आलेले नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिवसेना भाजपसोबत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासह आणखी 8 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र, त्यांना अद्याप मंत्रिमंडळात कोणतंही खातं दिलं नाही.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे. या संबधीचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकावर समितीचे अध्यक्ष ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. समितीच्या इतर सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार(वने),उदय सामंत(उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. तर वित्त मंत्री या समोर कोणतंही नाव लिहण्यात आलेलं नाही. (Latest Marathi News)

हे खाते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असून त्या ठिकाणी नाव लिहिण्यात आलेले नाही. त्यामुळे वित्त खाते अजित पवार गटाकडे आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)

तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने विरोध केला आहे. (Latest Marathi News)

तर भाजपने अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिल्याच्या चर्चा दिसून येत आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे.(Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे. या समितीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढे वने मंत्री , उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुढे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही.(Latest Marathi News)

अर्थमंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थखातं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही फडणवीस यांचा उल्लेख त्या रिक्त जागी करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आहे का? अशा चर्चा सुरू आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT