vehicle insurance sakal
महाराष्ट्र बातम्या

वाहनधारकांवर थर्डपार्टी विम्याचा आर्थीक भार वाढणार

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नविन आर्थिक वर्षात थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमीयम मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नविन आर्थिक वर्षात थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमीयम मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - केंद्रीय रस्ते वाहतूक (Road Transport) व महामार्ग मंत्रालयाने नविन आर्थिक वर्षात थर्ड पार्टी विम्याच्या (Third Party Insurance) प्रिमीयम मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात विम्याच्या प्रिमीयममध्ये (Premium) वाढ झाली नसल्याने यावर्षी भरघोस वाढ दिसून येणार आहे. खासगी वाहनधारकांसह वाहतुकदारांनाही आता विमा हफ्त्याचा अतिरीक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या थर्डपार्टी विमाच्या प्रिमीयम वाढीच्या निर्णयाला ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. देशातील खाजगी विमा कंपनी आल्या पासून सातत्याने विम्याच्या प्रीमियम मध्ये वाढ केली जाते. देशात अपघाताचे प्रमाण कमी झालेले असताना देखील थर्ड पार्टी विमा प्रीमियम मध्ये वाढ होणे चुकीचे असल्याची टिका आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केली. शिवाय गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात वाहन उभेच असतांना देखील विम्याला मुदतवाढ दिली नसल्याचेही बाबा शिंदे यांनी सांगितले आहे.

देशातील वाहतूकदार आधीच सातत्याने इंधन दरवाढीला सामोरे जात असून, रस्त्यावरील भ्रष्टाचार, टोल टॅक्स, वाहनाचा मेंटेनन्स यामुळे आर्थिक विवंचनेत आहे. व्यवसायाच्या ऑपरेशन कॉस्ट, मिळवणे देखिल कठीण होत आहे. त्यामूळे थर्ड पार्टी विमा प्रीमियम वाढ करू नये अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसचे सदस्य सदस्य बाबा शिंदे यांनी केली आहे.

असे असतील नवे प्रिमीयम

वाहन प्रकार - प्रिमीयम

- कार 1000 सीसी - 2094

1000 सीसी ते 1500 सीसी - 3416

1500 सीसी पेक्षा जास्त - 7897

- दुचाकी 75 सीसी - 538

75 ते 150 सीसी - 714

150 ते 350 सीसी - 1366

350 सीसी पेक्षा जास्त - 2804

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT