महाराष्ट्र

महिलांसाठी हक्काचे आर्थिक व्यासपीठ : प्रभू 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कल्पना आणि लोकसहभाग महत्त्वपूर्ण असतो. सक्रिय लोकसहभागातून विकास पूर्णत्वास जातो आणि समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नवकल्पना महत्त्वपूर्ण ठरतात. अशाप्रकारे जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू मानून नवकल्पनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विकास गाठताना यातून महिलांना हक्‍काचे आर्थिक व्यासपीठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले. 

हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या दोन योजनांचे आज मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूममध्ये उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील- निलंगेकर उपस्थित होते. 
प्रभू म्हणाले, ""जागतिक पातळीवर महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी, तसेच महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी "हिरकणी महाराष्ट्राची' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी, तसेच राज्याच्या पर्यायाने देशाच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने हे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत, त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. 

ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेल्या कल्पनाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न "हिरकणी महाराष्ट्राची'मधून करण्यात येणार आहे. याची सुरवात लातूर आणि चंद्रपूर येथून होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील बचत गटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना कौशल्य प्रशिक्षणातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची निवड होणार आहे, तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यपातळीवर एका हिरकणीची निवड करण्यात येणार आहे. 

- संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकासमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT